सोशल मिडियावर ओळख वाढवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार | पुढारी

सोशल मिडियावर ओळख वाढवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पुणे : समाजमाध्यमावर झालेल्या ओळखीतून 15 वर्षीय शाळकरी मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रोहन दास याच्याविरोधात बलात्कार आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे. 15 वर्षीय शाळकरी मुलीची आरोपी दास याच्याशी समाजमाध्यमावर ओळख झाली होती. आरोपी दासने तिला जाळ्यात ओढले. त्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला.

Back to top button