पुणे : अपहरण करत खंडणी मागणार्‍यांना अटक | पुढारी

पुणे : अपहरण करत खंडणी मागणार्‍यांना अटक

पुणे : पुढारी वृत्तसेवा : तरुणाचे अपहण करून 20 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी हिंजवडी पोलिसांनी तीन तरुणांना अटक करण्यात आली. ज्ञानेश्वर किसन चव्हाण (वय 23), लखन किसन चव्हाण (वय 26), लक्ष्मण नथूजी डोंगरे (वय 22) अशी त्यांची नावे आहेत. न्यायालयाने त्यांना 7 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

या प्रकरणी दोन अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत 35 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. 2 जुलै 2022 रोत्री रात्री 9 वाजता हिंजवडी फेज 2 परिसरात ही घटना घडली. फिर्यादी यांच्या 15 वर्षीय मुलाचे आरोपींनी त्याचे अपहरण केले. त्यानंतर त्याच्या वडिलांच्या मोबाईलवर फोन करून 20 लाखांची खंडणी मागितली. या प्रकरणी तिघांना पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली.

Back to top button