

पुणे : वारजे माळवाडीत गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथक 1 ने 20 किलो 215 ग्रॅम गांजा जप्त करीत दोघांना अटक केली.
सागर विलास शिंदे (36, रा. मंगळवार पेठ, तसेच वाडकरमळा, हडपसर) व गुलटेकडीतील वृध्दावरदेखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 6 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
वारजे-माळवाडी पोलिस ठाण्यात एनडीपीएस अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमली पदार्थविरोधी पथक 1 चे वरिष्ठ निरीक्षक विनायक गायकवाड , सहायक पोलिस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे व अंमलदार मनोज साळुंखे, मारुती पारधी, राहुल जाधव यांनी ही कारवाई केली.