पुणे : उड्डाणपुलाखाली ‘पे अँड पार्क’ | पुढारी

पुणे : उड्डाणपुलाखाली ‘पे अँड पार्क’

पुणे : कर्वे रस्त्यावरील दुमजली उड्डाणपुलाखाली पे अँड पार्क योजना राबवण्यात येणार आहे. त्यामुळे पुलाखालील राडारोडा तत्काळ काढावा, असे पत्र महापालिकेने महामेट्रोला पाठविले आहे. कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप चौकातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी महामेट्रोच्या माध्यमातून दुहेरी उड्डाणपूल उभारण्यात आला आहे.

या उड्डाणपुलाच्या सेवा रस्त्यामुळे या रस्त्यावर पार्किंगचा प्रश्न निर्माण झाला आहे. याचा परिणामी येथील व्यवसायांवरही झाला होता. या पार्श्वभूमीवर पुलाखाली चारचाकी आणि दुचाकीसाठी वाहनतळ करावे, अशी मागणी कर्वे रस्त्यावरील व्यापारी संघटनेकडून वारंवार महापालिकेकडे करण्यात येत होती. या अनुषंगाने पुलाखालील मोकळ्या जागेत ‘पे अ‍ॅण्ड पार्क’ योजना राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. तसेच सुशोभीकरणही केले जाणार आहे. त्यामुळे साहित्य काढण्यात यावे, असे पत्र महापालिका प्रशासनाने मेट्रोला पाठविले आहे.

Back to top button