अय्यर, अंताड, दुधाने अंतिम फेरीत; 10 वर्षांखालील टेनिस सर्किट स्पर्धा | पुढारी

अय्यर, अंताड, दुधाने अंतिम फेरीत; 10 वर्षांखालील टेनिस सर्किट स्पर्धा

पुणे; पुढारी वृत्तसेवा: एमएसएलटीए सुहाना स्मार्ट 10 वर्षांखालील टेनिस सर्किट या लीग स्पर्धेत मुलींच्या गटात नक्षत्रा अय्यर, अविघ्ना अंताड यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. सोलापूर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात अधिराज दुधाने, यशवंतराजे पवार या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव केला.

एमएसएलटीए टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत मुलींच्या गटात नक्षत्रा अय्यर हिने अव्वल मानांकित मायरा शेखचा 6-2 असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. दुसर्‍या उपांत्य फेरीच्या लढतीत अविघ्ना अंताड हिने तिसर्‍या मानांकित समिक्षा शेट्टीचा 6-4 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. मुलांच्या गटात उपांत्य फेरीत अव्वल मानांकित अधिराज दुधाने याने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत पाचव्या मानांकित वीर चतुरचा 6-0 असा एकतर्फी पराभव केला.

Back to top button