शाहरा, शर्मा, सिंग, मिश्रा, गुप्ता विजयी; खुली राष्ट्रीय अजिंक्यपद स्क्वॉश स्पर्धा | पुढारी

शाहरा, शर्मा, सिंग, मिश्रा, गुप्ता विजयी; खुली राष्ट्रीय अजिंक्यपद स्क्वॉश स्पर्धा

पुणे: पुढारी वृत्तसेवा: ‘सीएसके आयस्क्वॉश करंडक’ 2022 खुल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्क्वॉश स्पर्धेत 13 वर्षांखालील गटात महाराष्ट्राच्या अरिका मिश्रा हिने दिल्लीच्या काशवी मंगल हिचा पराभव करत विजेतेपद मिळवले. मुलांच्या गटात मध्य प्रदेशच्या सहर्ष शाहरा याने तामिळनाडूच्या लक्ष्मणा हरी याचा पराभव केला. या स्पर्धेच्या 11 वर्षांखालील गटात राजस्थान फरीद अन्द्राबी याने महाराष्ट्राच्या ब्रुहान भानपूरवाला याचा पराभव केला. मुलींच्या गटात उत्तर प्रदेशच्या फाबिहा नाफिस हिने तामिळनाडूच्या आणि दुसर्‍या मानांकित अनन्या गणेश हिचा पराभव करून विजेतेपद संपादन केले.

15 वर्षांखालील मुलांच्या गटामध्ये दुसर्‍या मानांकित महाराष्ट्राच्या देव शर्मा याने आग्रमानांकित महाराष्ट्राच्याच वेदांत छेड्डा याचा पराभव करून विजेतेपद मिळवले. अग्रमानांकित आकांक्षा गुप्ता हिने रुद्रा सिंग हिचा पराभव करून मुलींच्या गटाचे विजेतेपद मिळवले. 17 वर्षांखालील मुलांच्या गटात राजस्थानच्या अवलोकित सिंग याने महाराष्ट्राच्या आदित्य चंदानी याला हरवले. महाराष्ट्राच्या निरूपमा दुबे हिने उत्तर प्रदेशच्या खुशबू हिचा पराभव केला. 19 वर्षांखालील मुलींच्या गटात उत्तर प्रदेशच्या नाव्या गुप्ता हिने तामिळनाडूच्या दीपिका व्हि. असा पराभव करून मुलींच्या गटाचे विजेतेपद मिळवले.

Back to top button