

पुणे : पुढारी वृत्तसेवा: फन फिटनेस आणि पुणेरी वॉरियर्सने पीडीएफए लीग 2021-22 च्या चौदा वर्षांखालील स्पर्धेत आणि महिला लीगमध्ये सहज विजय मिळवला. एसएसपीएमएस मैदानावर फन फिटनेसने सनराइज एससीचा 4-2 असा पराभव केला. फन फिटनेसने प्रणव शेट्टी द्वारे लवकर गोल केला, त्याआधी रियान जैन (5, 16 वे मिनिट) आणि रचित भटेवरा (32 मि.) याने केलेल्या गोलने संघाला 4-0 अशी आघाडी मिळवून दिली. चिन्मय ढाकुलकर (34 मि.) आणि निहार जाधव (39 मि.) गोलच्या बळावर सनराइज स्पोर्ट्स क्लबने दोन गोल मागे खेचले.
महिला लीग सुपर-6 चकमकीमध्ये, पुणेरी वॉरियर्सने उत्कर्ष क्रीडा मंचचा 2-0 असा पराभव करत तीन सामन्यांतून तिसरा विजय नोंदवला. निलिशा संकेत (30 मि.) आणि साक्षी बने (59 मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केल्याने पुणेरी वॉरियर्सचा विजय झाला.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे ः 14 वर्षांखालील ः स्पोर्टिव्ह एफए: 2 (प्रथमेश निनावे 26 मि., श्रेयस जाधव 38 मि.) बीटी पुणेरी वॉरियर्स: 1 (आदर्श कमन 21 मि.). फन फिटनेस: 4 (प्रणव शेट्टी 2 मि.; रियान जैन 5 मि., 16 मि.; रचित भटेवरा 32 मि.) बीटी सनराईज स्पोर्ट्स क्लब: 2 (चिन्मय ढाकुलकर 34 मि., निहार जाधव 39 मि.). महिला लीग ः सुपर-6 अस्पायर एफसी ः 0 ने डेक्कन इलेव्हन ः 0 बरोबर बरोबरी साधली.