जुन्नरमध्ये तलावात बुडून 2 मुलांचा मृत्यू | पुढारी

जुन्नरमध्ये तलावात बुडून 2 मुलांचा मृत्यू

जुन्नर : पुढारी वृत्तसेवा: जुन्नर शहरालगत असलेल्या पद्मावती तलावाजवळील एका खड्ड्यात पाय घसरून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (दि. 3) दुपारी घडली. सम्राट देवेंद्र परदेशी (वय 14) व पवन दुर्गेश ठाकूर (वय 13, दोघेही रा. परदेशपुरा, जुन्नर) अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघे पद्मावती तलाव परिसरात फिरायला गेले होते. येथून जात असताना या तलावाशेजारी असलेल्या खड्ड्यात पवन पाय घसरून पडला.

त्याला वाचविण्यासाठी सम्राट पाण्यात उतरला. मात्र, दोघांनाही पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे, तसेच खड्ड्यातील गाळामुळे ते पाण्यात बुडू लागले. तेथून जाणार्‍या स्थानिकांच्या मदतीने या दोघांना बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. दोघेही एकुलती एक मुले असून, शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Back to top button