आषाढी एकादशीसाठी 550 बसची व्यवस्था | पुढारी

आषाढी एकादशीसाठी 550 बसची व्यवस्था

बारामती : पुढारी वृत्तसेवा: पंढरपूर येथील आषाढी एकादशीनिमित्त भरणार्‍या यात्रेसाठी 8 ते 14 जुलैदरम्यान दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांच्या सोयीसाठी पुणे विभागामार्फत एसटीच्या 550 बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी ही माहिती दिली. दरवर्षाप्रमाण े या वर्षीही सर्व आगारांमधून पंढरपूरला जाणार्‍या भाविकांसाठी 40 प्रवाशांच्या ग्रुपने नजीकच्या आगाराकडे मागणी केल्यास अ‍ॅडव्हान्स बुकिंग करून जाण्या-येण्यासाठी थेट गावातून बस सोडण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

त्यासाठी नजीकच्या आगारात स्वारगेट, शिवाजीनगर, भोर, बारामती, शिरूर, नारायणगाव, राजगुरुनगर, तळेगाव, इंदापूर, सासवड, दौंड, पिंपरी-चिंचवड, बारामती आणि बारामती एमआयडीसी या आगारांत संपर्क साधण्याबाबत आवाहन एसटीच्या वतीने करण्यात आले आहे. पुणे विभागातील सर्व आगार व्यवस्थापकांचा दूरध्वनी क्रमांक सोबत जोडून देण्यात आला असून, जादा बसगाड्यांच्या आरक्षणाची पुणे व पंढरपूर येथे सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी संबंधित आगारप्रमुखांशी संपर्क साधावा. भाविकांनी सुरक्षित सेवेचा लाभ घेऊन एसटीने प्रवास करावा व खासगी वाहतुकीचा प्रवास टाळावा, असे आवाहन एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी केले

Back to top button