पिंपरी : गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक | पुढारी

पिंपरी : गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक

पिंपरी : क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने तरुणाची एक लाख 98 हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 1 ऑगस्ट 2021 ते 4 जानेवारी 2022 या कालावधीत मुळशीतील दत्तवाडी येथे घडली. योगेश दत्तात्रय शिंदे (21, रा. दत्तवाडी, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

त्यानुसार अशोक कैलास कुरडुले, माणिक राठोड (दोघे रा. बीड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. आरोपींनी फिर्यादी यांना क्रिप्टो करन्सीत पैसे गुंतवणूक करण्यास सांगतले. त्यासाठी फिर्यादीकडून पाच लाख 62 हजार रुपये घेतले. यातील काही रक्कम परत देऊन एक लाख 98 हजार परत न देता फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

Back to top button