कामशेत परिसरातील रस्त्यावर लिंबू, मिर्चीचे पेव | पुढारी

कामशेत परिसरातील रस्त्यावर लिंबू, मिर्चीचे पेव

कामशेत : पुढारी वृत्तसेवा : परिसरात अमावस्या, पौर्णिमा किंवा सूर्य-चंद्र ग्रहणाच्या रात्रीच्यावेळी रस्त्यावर कुंकू लावलेले लिंबू, मिर्ची टाकून अंधश्रद्धा पसरविण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढत होत आहे. परिसरातील रस्त्यावर, घराबाहेर, शेतामध्ये जादूटोण्याचे प्रकार घडत आहेत. नाणे मावळात अथवा ग्रामीण भागात अंधश्रद्धा अद्याप कमी होताना दिसत नाही.

असाच अंधश्रद्धेचा प्रकार नुकताच नाणे येथील रस्त्यावर घडला. अज्ञात व्यक्तीने रात्रीच्यावेळी लिंबू, मिरच्या, टाचण्या, पुर्‍या, अंडी, कुंकू, कोहळ, गुलाल, बाहुली, नारळ ठेवले असल्याचे समोर आले आहे. हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. त्यामुळे आजूबाजूच्या ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी अशा व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
काहींच्या घरासमोर मिरच्या, लिंबू, नारळ ठेवले असल्याचे समोर आले आहे.

Back to top button