पिंपरी : विनयभंगप्रकरणी एकास अटक | पुढारी

पिंपरी : विनयभंगप्रकरणी एकास अटक

पिंपरी : महिलेच्या विनयभंग प्रकरणी एका तरुणास अटक करण्यात आली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 30) मध्यरात्री रामनगर, बोपखेल येथे घडली. अनिकेत जोगदंड (28) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तसेच, अविनाश जोगदंड (36, दोघे रा. रामनगर, बोपखेल) याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पीडितेने (38) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुरुवारी मध्यरात्री आरोपी फिर्यादी यांच्या घरात घुसले. त्यावेळी फिर्यादी यांनी आरोपींना घराबाहेर जाण्यास सांगितले. त्यामुळे आरोपी अनिकेत याने फिर्यादिसोबत गैरवर्तन केले. तसेच, आरोपी अविनाश याने शिवीगाळ करून फिर्यादी यांचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

Back to top button