पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीसंदर्भात तब्बल 4 हजार हरकती महापालिकेस शुक्रवार (दि.1) पर्यंत प्राप्त झाल्या आहेत. शेवटच्या दोन दिवसात मोठ्या संख्येने हरकती दाखल होण्याची शक्यता आहे. पालिकेने 46 प्रभागाची प्रारूप मतदार यादी गुरूवारी (दि.23) प्रसिद्ध केली. त्यांनतर त्यावर सूचना व हरकती स्वीकारण्यास पालिकेच्या निवडणूक विभागाने सुरूवात केली.
यादीत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याच्या तक्रारी शहरभरातून वाढल्या आहेत. हरकतींची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.
निवडणूक विभागास शुक्रवारी सुमारे 1 हजार हरकती प्राप्त झाल्या. त्यात माजी नगरसेवक व इच्छुकांकडून गठ्ठ्याने अर्ज दाखल करण्यात आले. वैयक्तिक अर्जापेक्षा माजी नगरसेवक व राजकीय पदाधिकार्यांकडून हरकती घेण्याचे प्रमाण मोठे आहे.दरम्यान, अर्ज साप्ताहिक सुटीच्या दिवशी शनिवार (दि.2) व रविवारी (दि.3) ही स्वीकारले जाणार आहेत. हरकत नोंदविण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. आतापर्यंत 210 यादींची विक्री झाली असून, त्यातून 6 लाख 28 हजार 260 रूपयांचा भरणा पालिकेकडे
झाला आहे.