माळेगावात वारकर्‍यांना ‘पुढारी’चे वाटप | पुढारी

माळेगावात वारकर्‍यांना ‘पुढारी’चे वाटप

माळेगाव : पुढारी वृत्तसेवा: विविध संतांच्या पालखी सोहळ्याच्या वाटचालींची योग्य माहिती वारक-यांना देण्याच्या उद्देशाने माळेगाव बुद्रुक येथे श्री संत सोपानकाका महाराज यांच्या पालखी सोहळ्यात दैनिक पुढारी अंकाचे वाटप झाले. श्री संत सोपानकाका महाराज यांचा पालखी सोहळा कोर्‍हाळे, पणदरे गावातून माळेगाव येथे गुरुवारी (दि.30) मुक्कामी दाखल झाला. विशेष म्हणजे दहा वर्षांनंतर पहिल्यादांच पालखी सोहळा मुक्कामी असल्यामुळे या परिसरातील भाविकांमध्ये मोठी उत्सुकता होती.

दुसर्‍या दिवशी शुक्रवारी (दि.1) पालखी सोहळ्याला भावपूर्ण निरोप देताना रविराज तावरे-लाखे मित्र परिवाराच्या वतीने वारकर्‍यांना दैनिक पुढारी अंकाचे वाटप राष्ट्रवादी युवानेते रविराज तावरे यांच्या हस्ते केले. या वेळी अमित तावरे, रियाज शेख, रोहित शेळके, वैभव भोसले, रणजित शेळके, जगू शेळके आदींसह कार्यकर्त्यांनी अंक वाटप केले. दैनिक पुढारीमध्ये पालखी सोहळ्याचा मुक्काम, भोजन व्यवस्था, घटनांची माहिती प्रसिद्ध केली जात असल्याने वारकर्‍यांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.

 

Back to top button