पिस्तूल बाळगणारा वेटर गजाआड | पुढारी

पिस्तूल बाळगणारा वेटर गजाआड

पुणे : एका हॉटेलमध्ये काम करणार्‍या वेटरने पिस्तुलाच्या आकर्षणातून आणि मौजमजेसाठी मध्य प्रदेशातून पिस्तूल खरेदी करून आणले होते. ते पिस्तूल विक्रीसाठी ग्राहक शोधत असून, ते स्वतःजवळ बाळगत असल्याची माहिती बंडगार्डन पोलिसांना मिळाली. त्यानुसार जितेंद्र अण्णासाहेब हावले (वय 32, रा. दत्तवाड, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) या तरुणाला अटक केली असून, त्याच्याकडील पिस्तुलही पोलिसांनी जप्त केले.

बंडगार्डन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी सदरची विशेष मोहीम राबविणेकरिता बंडगार्डन पोलिस स्टेशनचे विशेष पथक तयार करून त्यांना पोलिस स्टेशन हद्दीमध्ये कसोशीने व सतर्कपणे गस्त घालून अशा प्रकारे अवैध अग्निशस्त्रे व हत्यारे बाळगणारे इसमांवर प्रभावीपणे कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तपास पथक बंडगार्डन हद्दीत गस्तीवर असताना पोलिस अमंलदार ज्ञाना बड़े व मनोज भोकरे यांना संशयित आरोपीविषयी माहिती मिळाली होती.

त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून देशी बनावटीचा कट्टा (पिस्तूल) व पाच जिवंत काडतुसे जप्त केली. पोलिस उपनिरीक्षक राहुल पवार, सहायक उपनिरीक्षक मोहन काळे, अंमलदार प्रताप गायकवाड, नितीन जगताप यांनी ही कारवाई केली.

घाटात पोलिस गस्त वाढवावी
बोपदेव घाटात लुटीच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. त्यासाठी कोंढवा पोलिसांनी घाटात पोलिस चौकी सुरू केली होती. मात्र, त्यानंतर देखील अशा घटना घडू लागल्या आहेत. बोपदेव घाटात अनेक तरुण-तरुणी फिरण्यासाठी येत असतात. त्यावेळी चोरट्यांकडून त्यांना टार्गेट केले जाते. अशा घटना वारंवार घडत असल्यामुळे नागरिकांनी घाटात पोलिस गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.

Back to top button