ताथवडे : उपनगरात पावसाची हजेरी | पुढारी

ताथवडे : उपनगरात पावसाची हजेरी

ताथवडे : येथील सिद्धिविनायक मॉल पाठीमागील काळाखडककडे जाणार्‍या रस्त्यावर पाणी साचल्याने वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागली. पावसामुळे रस्त्यावरील असणार्‍या सखल भागात पाणी साचले होते. त्यामुळे सकाळी मुलांना शाळेत सोडण्यासाठी गेलेल्या पालकांची चांगलीच तारांबळ उडाली.

साचलेल्या पाण्यामुळे वाहनाचा वेग मंदावून काही वेळ येथे वाहतूककोंडी झाली होती. परिणामी काही दुचाकीस्वार येथील जवळच असलेल्या काळाखडक झोपडपट्टीतील आतील भागातील रस्त्यावरून आपली वाहने नेत असल्याने काही प्रसंगी हमरीतुमरीचे प्रकार घडले.

जवळजवळ एक महिना विश्रांती घेतलेल्या पावसाने दोन दिवसांपासून चांगलाच जोर धरला आहे. परंतु, या पावसाने मात्र पावसळापूर्वी केलेल्या कामाची मात्र पोलखोल केली आहे. ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचले आहे. काही रस्त्यावर खड्डे पडल्याने त्यामध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना त्याचा अंदाज येत नव्हता. काही रस्त्यावरील कामे व्यवस्थित न झाल्याने रस्त्याच्याकडेला पाणी साचून राहत होते.

Back to top button