पिंपरी : विद्यार्थ्यांनी घेतला 8 टू 80 पार्कचा आनंद | पुढारी

पिंपरी : विद्यार्थ्यांनी घेतला 8 टू 80 पार्कचा आनंद

 

पिंपरी : महापालिका व पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडच्या वतीने सुदर्शननगर, पिंपळे गुरव येथील 8 टू 80 पार्कला शालेय विद्यार्थ्यांनी भेट दिली. त्या ठिकाणी साकारलेल्या नवकल्पनांची माहिती जाणून घेत विविध खेळांचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी मोहिम राबवून व पत्र लेखनातून स्मार्ट सिटी प्रकल्पांबाबत अनुभव नोंदविला.

या उपक्रमात आकुर्डी येथील श्री म्हाळसाकांत विद्यालयातील 70 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. स्मार्ट सिटीचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सुनील लाडके, शिक्षक अशोक आवारी, चंदन राऊत, उपअभियंता चंद्रकांत मोरे, कनिष्ठ अभियंता राहुल पाटील, फिल्ड इंजिनिअर अतुल फुलझेले, जयेश भदाणे आदी उपस्थित होते.

शहर अधिक स्मार्ट, सुरक्षित आणि अधिक गतिमान बनविण्यासाठी हरित शहर, नव्याने विकसीत झालेले प्रकल्प, नवकल्पना, तंत्रज्ञानाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

Back to top button