

बारामती : शहरातील कसबा भागातून 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तिच्या आईने फिर्याद दिली. फिर्यादीत नमूद केल्यानुसार दि. 29 रोजी ही घटना घडली. ही मुलगी शाळेला गेली होती. शाळा सुटल्यानंतर ती नेहमीप्रमाणे घरी आली नाही.
त्यामुळे कुटुंबीयांकडून तिचा शोध घेण्यात आला. तिच्या मैत्रिणींकडेही चौकशी करण्यात आली, परंतु ती सापडली नाही. अखेर पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद देण्यात आली. अज्ञाताने तिला कशाचे तरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले असावे, अशी शक्यता फिर्यादीत व्यक्त करण्यात आली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल
केला आहे.