घनकचरा संकलन कर आकारणी यंदापासून | पुढारी

घनकचरा संकलन कर आकारणी यंदापासून

बारामती: पुढारी वृत्तसेवा: भारत सरकारच्या पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालयाने घनकचरा व्यवस्थापन नियम लागू केले आहेत. त्यास अनुसरून महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत व औद्योगिक वसाहती अधिनियमांचा वापर करून बारामती नगरपालिकेकडून यंदापासून घनकचरा संकलन कर आकारणी लागू करण्यात येणार आहे. पालिकेकडून यासंबंधी पत्रकाद्वारे माहिती देण्यात आली.

त्यानुसार नगरपरिषद हद्दीमधील सर्व सार्वजनिक स्थळे, घरगुती, व्यावसायिक रुग्णालये, संस्था, कार्यालये, फेरीवाले आदी घनकचरा निर्माण करणार्‍या घटकांकडून कचरा संकलन करण्यासाठी उपयोजना शुल्क आकारणी केली जाणार आहे. यासंबंधी पालिकेच्या फेब्रुवारीत झालेल्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करण्यात आला आहे. वर्गवारीनुसार दरमहा होणारी घनकचरा कर आकारणी
घरगुती : 40 रुपये, व्यावसायिक : 80 ते 100 रुपये, रुग्णालये : 80 ते 120 रुपये, 60 ते 120 रुपये.

Back to top button