पिंपरी : बसस्टॉप समोर फरशा व राडारोडा | पुढारी

पिंपरी : बसस्टॉप समोर फरशा व राडारोडा

पिंपरी : पिंपरी मोरवाडी चौकात बस स्टॉपसमोरच फरशा व राडारोडा पडला आहे. यामुळे प्रवाशांना बसमध्ये चढ-उतार करताना अडथळा निर्माण होत आहे. हा राडारोडा उचलावा अशी मागणी प्रवासी करत आहेत.

शहरात ठिकठिकाणी पदपथ व रस्ते दुरुस्तीची कामे सुरु आहेत. त्यामुळे खोदलेले रस्ते आणि त्याठिकाणी असलेले पेव्हिंग ब्लॉक, फरशा, सिमेंट व वाळू यांचा राडारोडा पडलेला आहे. वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या बसस्टॉपजवळ प्रवाशांना पदपथ दुरुस्तीमुळे अडथळा होते आहे.

Back to top button