पिंपरी : दुचाकीस्वार तरुणाला मारहाण करीत लुटले | पुढारी

पिंपरी : दुचाकीस्वार तरुणाला मारहाण करीत लुटले

पिंपरी : दुचाकीस्वार तरुणाला मारहाण करीत त्याच्याकडील पैसे, मोबाईल आणि दुचाकी काढून घेतली. ही घटना सोमवारी (दि. 27) रात्री साडेअकराच्या सुमारास सुस येथे घडली. मकरंद दत्तात्रय पवार (30, रा. किरकिटवाडी, ता. हवेली, जि. पुणे) यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. 28) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार, चार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सोमवारी रात्री दुचाकीवरून जात होते. दरम्यान, सूसखिंड येथे रिक्षातून आलेल्या चोरट्यांनी फिर्यादी यांच्या खिशातून पाच हजार रुपये आणि दोन हजारांचा मोबाईल काढून घेतला. तसेच, एकाने कोयत्याचा धाक दाखवून फिर्यादी यांची दुचाकीची हिसकावून तेथून पळ काढला. हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button