उरुळी कांचन : कामावरून काढल्याने गोडाऊन पेटविले | पुढारी

उरुळी कांचन : कामावरून काढल्याने गोडाऊन पेटविले

उरुळी कांचन : फर्निचर दुकानात कामावर असलेल्या दोघांना मालकाने कामावरून काढल्याने त्यांनी फर्निचरचे गोडाऊन पेटवून दिल्याची धक्कादायक घटना उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बगाडेवस्तीत सोमवारी (दि.27) उघडकीस आली. या घटनेत तब्बल 50 लाखांचे फर्निचर जळून खाक झाले आहे.

ओंकार गायकवाड (वय 20) व एक अल्पवयीन मुलगा (दोघे रा. उरुळी कांचन, सोलापूर रस्ता) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी स्वप्नील भगवान कांचन (वय 36, रा. उरुळी कांचन) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, ओंकार गायकवाड आणि अल्पवयीन मुलगा हे फर्निचरच्या दुकानात काम करीत होते. दोघांना काही दिवसांपूर्वी कामावरून काढून टाकण्यात आले होते.

कामावरून काढल्याचा राग मनात धरून या दोघांनी गोडाऊनला आग लावल्याचा पोलिसांचा संशय आहे.या आगीत दुकानातील 50 लाखांच्या फर्निचरचे नुकसान झाले. याप्रकरणी कांचन यांनी ओंकार गायकवाड आणि अल्पवयीन मुलाने आग लावल्याचा संशयावरून लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

Back to top button