पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील वल्लभनगर बस डेपोमधून आषाढीवारी निमित्त श्री क्षेत्र पंढरपुरकडे जाण्यार्या वारकर्यांसाठी एसटीच्या 15 ज्यादा गाड्या धावणार आहेत. डेपोच्या माध्यमातून समुह बुकिंगची देखील सोय केली आहे. कोरोनाकाळात गेल्या दोन वर्षापासुन वैष्णवांना आपल्या लाडक्या पंढरीच्या विठ्ठलाचे दर्शन घेता आले नव्हते.
दोन वर्षानंतर दर्शनाची संधी मिळत असल्याने भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे. त्यामुळे वारकर्यांची कुठलीच गैरसोय होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाने जुलै सात ते चवदा या तारखांमध्ये पंधरा ज्यादा तर नियमितरित्या चार अशा एकोणावीस गाड्या वारकर्यांच्या सेवेसाठी धावणार आहेत. अशी माहिती वल्लभनगर बस आगार प्रमुख स्वाती आव्हाळे यांनी दिली आहे.