पिंपळे गुरव : पिंपळे गुरव भागातील कॉलनी ,सोसायटी ,गल्ल्यांमध्ये भटक्या कुत्र्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. या भटक्या कुत्र्यांमुळे परिरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ही भटकी कुत्री झुंडीने हिंडतात. परिसरातून ये-जा करणार्या नागरिकांच्या अंगावर धावून जातात.
तसेच भरधाव जाणार्या वाहनांच्या मागे पळत सुटतात. तसेच दुचाकीस्वारांचा चावा घेण्याच्या घटनाही घडल्या आहेत.
रात्री अपरात्री परिसरातून ये-जा करणार्या नागरिकांना भटक्या कुत्र्यांमुळे भीतीच्या सावटाखाली जावे लागते. टोळके रस्त्यावरील नागरिकांवर कधी हल्ला करतील याचा नेम नाही.
.ही भटकी कुत्री दुचाकी स्वाराच्या मागे धावल्यामुळे त्यांचेही अपघात घडत आहेत. भटक्या कुत्र्याची टोळके केवळ नागरी वस्ती नसून तर जीजा माता उद्यानात पाहायला मिळतात.त्यामुळे बागेत फिरण्यास जाणार्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे.