पुणे : पुढारी वृत्तसेवा: पहिल्या पीवायसी-रावेतकर फाइव्ह-अ-साइड फुटबॉल स्पर्धेत साखळी फेरीत अगस्त्य कुंटे (11, 14, 15 मि.) याने केलेल्या हॅटि्ट्रक कामगिरीच्या जोरावर शिल्ड संघाने अॅव्हेंजर्स संघाचा 4-1 असा पराभव करून शानदार सुरुवात केली. पीवायसी हिंदू जिमखाना क्लब आयोजित स्पर्धा कर्वे रोड येथील फुटबॉल या मैदानावर सुरू आहे. या स्पर्धेत साखळी फेरीत 13 वर्षांखालील गटात दुसर्या सामन्यात आरुष देवधर (6, 13 मि.) याने केलेल्या दोन गोलांच्या जोरावर अॅव्हेंजर्स संघाने गार्डियन्स संघाचा 4-0 असा पराभव करून सलग दुसरा विजय मिळविला.
खुल्या गटात विश्व रुकारी (7, 8, 10, 15 मि.) याने केलेल्या चार गोलांच्या जोरावर आर्मडोज संघाने रेंजर्स संघाचा 6-1 असा धुव्वा उडविला. तर, जय जय जोशी (2, 12 मि.), सोहम गांधी (3 मि.) यांच्या सुरेख खेळीच्या जोरावर वॉरियर्स संघाने रेबेल्स संघाचा 3-1 असा पराभव केला. स्पार्टन्स संघाने वायकिंग्ज संघावर 5-0 असा एकतर्फी विजय मिळवत शानदार सुरुवात केली. स्पार्टन्स संघाकडून यश परांजपे (3, 9, 22 मि.) याने सर्वाधिक तीन गोल केले. अन्य लढतीत ग्लॅडिएटर्स संघाने टायटन्स संघाचा पराभव केला.
स्पर्धेचा निकाल : 13 वर्षांखालील गट : अॅव्हेंजर्स : 4 (संवित 4 मि., आरुष देवधर 6, 13 मि., स्वयंगोल 27 मि.) वि. वि. गार्डियन्स: 0, शिल्ड : 4 (अगस्त्य 11, 14, 15 मि., रेवाश कासट 12 मि.) वि.वि. अॅव्हेंजर्स : 1 (संवित कासट 17 मि.).