पुणे: पुढारी वृत्तसेवा: पीएमपीएलच्या गुलटेकडीतील डेपोतून बॅटर्या चोरी करणार्या चोरट्याला स्वारगेट पोलिसांनी पाठलाग करून पकडले. त्याच्याकडून 12 बॅटर्या जप्त करण्यात आल्या. मुस्ताफा ऊर्फ भुर्या तन्वीर खान (वय 19, रा. गुलटेकडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. बॅटर्या चोरीचा गुन्हा दाखल होता.
तपास करताना पोलिस कर्मचारी फिरोज शेख, शिवा गायकवाड, सोमनाथ कांबळे यांना चोरी भुर्याने केल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर, गुन्हे निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अशोक येवले यांच्या पथकाने भुर्याला पकडले.