पिंपरी : महापालिकेतर्फे कनिष्ठ गट आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा | पुढारी

पिंपरी : महापालिकेतर्फे कनिष्ठ गट आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्यावतीने फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल हॉकीच्या (एफआयएच) मान्यतेने हॉकी इंडिया व हॉकी महाराष्ट्र यांच्या सहकार्याने नेेहरूनगर, पिंपरी येथील मेजर ध्यानचंद हॉकी पॉलिग्रास स्टेडीयम येथे 6 देशांची कनिष्ठ गट आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा आयोजित केली आहे. त्यासाठी 11 कोटी 3 लाख खर्चास आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी स्थायी समितीमध्ये मंगळवारी (दि.28) मंजुरी दिली.

ती स्पर्धा येत्या सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात दिवस-रात्र आयोजित केली जाणार आहे. स्पर्धेसाठी स्टेडिमय व मैदानावर विविध कामे केली जाणार आहेत. क्रीडा, वाहन दुरूस्ती कार्यशाळा, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विद्युत विभाग आणि ह क्षेत्रीय कार्यालयाकडून विविध कामे केली जाणार आहेत. काही खर्च प्रायोजकत्व घेऊन केला जाणार आहे. स्पर्धेसाठी विविध सोयी सुविधा तसेच कामांच्या खर्चास आयुक्तांनी मान्यता दिली. स्टेडिमयमधील स्थापत्यविषयक कामे करण्यासाठी नियोजन कन्सल्टंट यांची नियुक्त करण्यात आली आहे.

Back to top button