पिंपरी : ज्येष्ठ महिलेने टाकाऊतून ‘फुलवली’ बाग, यूट्यूबद्वारे पार्किंगमध्ये घडविली किमया

पिंपरी : ज्येष्ठ महिलेने टाकाऊतून ‘फुलवली’ बाग, यूट्यूबद्वारे पार्किंगमध्ये घडविली किमया
Published on
Updated on

राहुल हातोले

पिंपरी : घरात वापरात आलेल्या पाणी बॉटल, तेलाचे कॅन, अडगळीत पडलेल्या विणलेल्या टोपल्या, तुटलेल्या प्लॅस्टिकच्या बादल्या अशा वस्तूंना यूट्यूबवरील माहितीद्वारे विविध प्राण्यांच्या आकाराच्या कुंड्या बनवून, शंभरहून अधिक आयुर्वेदिक वृक्षांची लागवड करून, पार्किंग सजविली आहे, सरोज धजाल या जेष्ठ महिलेने.

मोशी येथील तुलशी दोन सोसायटीत वास्तव्य करणार्‍या एकसष्ठ वर्षीय सरोज यांनी लॉकडाउनमध्ये युट्युबच्या माध्यमातून टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनविण्याचा उपक्रम हाती घेतला. प्लॅस्टिकच्या अडगळीत पडलेल्या आणि टाकाऊ वस्तूंना हत्ती, घोडा, जिराफ अशा प्राण्यांचे आकार देत, यामध्ये गोकर्ण, आळू, वड, पिंपळ, पेरू, झिजी प्लँट, जास्वंद, मोगरा, गुलाब, सदाफुली तसेच रेनलिली आदींसह शंभरहून अधिक झाडे त्यांनी जोपासली आहेत.

सोसायटीच्या वापरात नसलेल्या जागेतही त्यांनी आंबा, पपई सारखी झाडे लावली आहेत. या झाडांना आवश्यक असणारे खतदेखील त्यांनी आपल्या घरातच बनविले आहे.

लॉकडाऊनमुळे यूट्यूबच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू केला. दोन पार्किंग असल्याने एका पाकिर्ंंगचा उपयोग यासाठी केला. मात्र आता सोसायटीत सगळीकडे मिळेल त्या ठिकाणी वृक्षांची लागवड केली आहे. आजूबाजूला एमआयडीसी असल्याने हवेचे प्रदूषण होते, मात्र या वृक्षांमुळे आता शुद्ध हवा मिळत आहे.
– सरोज धजाल

अरेका, तुळशी यांसारख्या दिवस-रात्र ऑक्सिजन देणारी वृक्षांचीही लागवड त्यांनी केली आहे. आयुर्वेदिक वृक्ष गडचिरोली, भंडारा येथून आणल्याने त्यांनी सांगितले.

खतही घरगुतीच
स्वयंपाक घरातील दररोजचा निघणारा ओला कचरा, वापरलेली चहा पावडर, लिंबू तसेच तोडलेल्या भाज्यांची देठं उन्हात वाळवून त्यांनी खत बनविले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news