भोर शहरात मुलाने केली सावत्र आईची हत्या; पहाटेच्या सुमारास घडली घटना | पुढारी

भोर शहरात मुलाने केली सावत्र आईची हत्या; पहाटेच्या सुमारास घडली घटना

भोर : पुढारी वृत्तसेवा: भोर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी वडिलांबरोबर दुसरे लग्न करून राहत असल्याचा राग मनात धरून पहाटे 5 च्या सुमारास सावत्र आईचा मुलाने धारदार शस्त्राने व दगडी पाटा डोक्यात घालून हत्या केली. यामध्ये रेश्मा अंकुश शिंदे मृत झाली. ही घटना बुधवारी (दि. 29) घडली. आरोपी फरार झाला आहे, अशी फिर्याद क्षितिजा सदाशिव खोपडे हिने भोर पोलिसात दिली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे करत आहेत.

भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून रेश्माची मुलगी क्षितिजा सदाशिव खोपडे (रा. धन्वंतरी प्लाझा, मंगळवार पेठ, भोर, मूळ रा. बाजारवाडी, ता. भोर) हिने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, घरात माझी आई रेश्मा सदाशिव खोपडे हिचे दुसर्‍या लग्नानंतरचे नाव रेश्मा अंकुश शिंदे (वय 36) हिचा माझा सावत्र भाऊ शिवम अंकुश शिंदे (वय 22, रा. कात्रज, पुणे, मूळ रा. बाजारवाडी, ता. भोर) याने त्याचे वडील अंकुश शिंदे यांनी माझी आई हिचे सोबत दुसरे लग्न करून राहत असल्याच्या कारणावरून धारदार शस्त्राने गळा कापून तसेच सोफ्याचे उशीचे कापडी कव्हरमध्ये पाट्याचा मोठा दगड डोक्यात घालून हत्या केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक विठ्ठल दबडे करत आहेत.

 

Back to top button