पुणे : आषाढीच्या पार्श्वभूमीवर इंदापूरमधून जादा बस

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर इंदापूर आगार व्यवस्थापक मेहबूब मनेर यांनी प्रवाशांसाठी महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. एसटीचा कोणता मार्ग खुला राहणार आहे, कोणता बंद राहणार आहे, कोणती वाहतूक वळवली आहे या संदर्भात सांगितले आहे. तसेच जंक्शन स्थानकापर्यंत जादा बसची व्यवस्था केली आहे.
मोठी बातमी : ठाकरे सरकारची अग्निपरीक्षा! उद्याच बहुमत सिद्ध करा, राज्यपालांचे आदेश
जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बुधवारी (दि.29) बारामतीवरून इंदापूरमध्ये दाखल होत आहे. पालखीच्या अनुषंगाने इंदापूर- बारामती रस्ता जंक्शनपासून पुढे बंद करणार आहे. मात्र, भाविक व प्रवाशांच्या सोईसाठी इंदापूर बस आगारातून चार बस वालचंदनगर, जांब मार्गे व दोन बस या कळस मार्गे बारामतीसाठी सोडणार आहे. भाविकांसाठी जंक्शन स्थानकापर्यंत जादा बसची व्यवस्था केल्याचे मेहबूब मनेर यांनी सांगितले.
Big breaking : आमदारांना घेऊन मी उद्या मुंबईत येतोय! बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांची घोषणा
बारामती मार्गावर गुरुवार (दि.30) पासून सहा बस कळस मार्गे जाणार आहेत आणि दोन बस या ज्यादा खास यात्रेसाठी इंदापूर ते निमगाव केतकी अशी वाहतूक करणार आहेत. त्यानंतर इंदापूरमध्ये दोन ते तीन जुलैदरम्यान बारामती वाहतूक पूर्ण चालू राहणार आहे. अकलूज वाहतूक बंद राहील. त्याचबरोबर जे भाविक पंढरपूरला जाण्यासाठी इच्छुक असतील किंवा वारीनिमित्ताने पंढरपुरात होणारी गर्दी पाहता आठ ते दहा बस या दिनांक 2, 3 व 4 तारखेला सोडणार आहे. चार तारखेला रस्ता पूर्णपणे बंद राहणार आहे. चार तारखेला अकलूज गाड्या टेंभुर्णी मार्गे पंढरपूरसाठी सहा गाड्या वळवलेल्या आहेत. त्याचबरोबर तीन तारखेला इंदापूर बसस्थानकात मराठवाड्यातील एक दिंडी मुक्कामास येणार आहे, त्यांच्यासाठी पाण्याची, स्वच्छतेची सर्व सोय केली आहे.
चुना कसा लावतात ते आता संजय राऊतांना दाखवतो : गुलाबराव पाटील (व्हिडीओ)
आषाढी यात्रेसाठी आठ ते चौदा जुलै या आठ दिवसांच्या कालावधीत इंदापूर आगारातर्फे 26 बस पाठवण्याचे नियोजन केले आहे. इंदापूर, अकलूज, पंढरपूर परत इंदापूर असा त्यांचा दररोजचा प्रवास राहणार आहे. पंढरपूरकरिता ग्रुप बुकिंग असेल, कमीत कमी 40 प्रवासी असतील तर बुकिंग करून देण्याची सोय वालचंदनगर, भिगवण, इंदापूर बसस्थानकावर केली आहे.
-महेबूब मनेर, आगारप्रमुख