सिंहगड रस्त्याने घेतला मोकळा श्वास, रस्त्यावरील 412 फ्लेक्स हटवले | पुढारी

सिंहगड रस्त्याने घेतला मोकळा श्वास, रस्त्यावरील 412 फ्लेक्स हटवले

सिंहगड रोड : पुढारी वृत्तसेवा : सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आकाशचिन्ह विभागाने धडक कारवाई करताना तब्बल 412 अनधिकृत फ्लेक्स हटविले. महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली. कारवाईमध्ये सिंहगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडगाव, नर्‍हे व अभिरुची पोलीस चौकीचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

दांडेकर पुलापासून कारवाईला सुरुवात करण्यात आली. हिंगणे, वडगाव, सनसिटी, धायरी, नर्‍हे, खडकवासलापर्यंत ही कारवाई करण्यात आली. सिंहगड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष संखे यांच्या सहकार्याने परवाना व आकाशचिन्ह निरीक्षक युवराज वाघ यांनी ही कारवाई केली.

Back to top button