

तळेगाव: शहरात अनेक ठिकाणी धोकादायक खड्डे आणि चाऱ्या असल्याने अपघातास आमंत्रण मिळत आहे. स्टेशन भागात' एसटीस्टँड, रेल्वे स्टेशन परिसर, हिंदमाता भुयारी मार्ग, तळेगाव-चाकण महामार्ग, वराळे फाटा रोड आदी ठिकाणी खड्डे आणि रस्त्याच्या कडेला चाऱ्या आहेत. काही ठिकाणी रस्त्याच्या बरोबर मध्यभागी खड्डे आहेत.
यापुर्वी या खड्डयामुले अपघात होऊन त्यामध्ये जीवीत हानी झालेली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे धोकादायक खड्डयात पाणी साचणार आहे. यामुळे दुचाकी, रिक्षा, चारचाकी आदी वाहन चालकांना अंदाज येऊ शकणार नाही. त्यामुळे अपघात होऊन जीवीत हानी होण्याची शक्यता आहे. या रस्त्यांवर सर्वत्र वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. धावणारे वाहन कडेला घेताना रस्त्यालगतच्या खड्डयात जाऊन अपघात होतात. हे खड्डे वाहन चालकांच्या दृष्टीने फारच धोकादायक झालेले आहेत. तरी प्रशासनाने याची दखल घ्यावी अशी नागरिकांची मागणी आहे.