पिंपरी: सार्वजनिक शौचालय साफसफाईसाठी 97 लाख | पुढारी

पिंपरी: सार्वजनिक शौचालय साफसफाईसाठी 97 लाख

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरीतील शास्त्रीनगर येथील सार्वजनिक शौचालय साफसफाई, देखभाल व दुरूस्तीचे काम निविदा न काढता थेट पद्धतीने नवी दिशा महिला बहुउद्देशीय मंडळास देण्यात आले आहे. त्या कामासाठी दीड वर्षांकरिता 97 लाख 200 खर्च आहे.

महापालिकेचे सार्वजनिक शौचालयाचे देखभाल व दुरूस्तीच्या कामामध्ये सुधारणा करण्यासाठी त्या नागरिकांना सहभागी करून घेण्याचा निर्णय आयुक्त राजेश पाटील यांच्या समवेत झालेल्या बैठकीत 3 जानेवारी 2022 ला झाला आहे. शौचालयामध्ये नागरिकांचा ओनरशीप पार्ट आणावा याकरीता दुरूस्तीचे कामकाजाची जबाबदारी ठेकेदाराला न देता स्थानिक बचत गट किंवा युथ क्लबला सध्याच्या दराने काम देण्यात यावे व त्याचा मोदबला द्यावा, असे ठरले होते.

सीटीओ कार्यालयाने प्रति सीट प्रति महिना 900 रूपये दर निश्चित केला आहे. नवी दिशा महिला मंडळाने शास्त्रीनगरमधील 18 सिट्सचे 2 ब्लॉकचे काम करण्यास तयार असल्याचे पालिकेस 25 फेबु्रवारी 2022 ला कळविले होते. ग क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाच्या या प्रस्तावाला आयुक्त पाटील यांनी 17 मार्च 2022 ला मंजुरी दिली. तर, 28 मार्च 2022 ला मंडळास वर्कऑर्डर देण्यात आली. शौचालय स्वच्छता, देखभाल व दुरूस्तीसाठी दीड वर्षांसाठी महिला मंडळास 97 लाख 200 रूपये देण्यात येणार आहेत.

Back to top button