पुणे : पाऊस लांबल्याने उसाच्या लागणीवर परिणाम | पुढारी

पुणे : पाऊस लांबल्याने उसाच्या लागणीवर परिणाम

भवानीनगर : पुढारी वृत्तसेवा : पावसाने ओढ दिल्यामुळे श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उसाच्या लागणीवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला माेठा निर्णय : मंत्री, राज्यमंत्री यांच्याकडील खात्यांचे फेरवाटप

श्री छत्रपती कारखान्याने 1 जुलैपासून कारखान्याचा ऊस लागण हंगाम जाहीर केला आहे. इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये जून महिना संपत आला, तरी समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसलेले आहेत. कित्येक शेतकर्‍यांनी उसाची लागणी करण्यासाठी सर्‍या काढलेल्या नाहीत. काही शेतकर्‍यांनी सर्‍या काढून ठेवलेल्या असल्या, तरी चांगला पाऊस झाल्याशिवाय लागणी करणे शक्य नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका

सध्या असलेली उसाची पिके जगविण्याचे शेतकर्‍यांपुढे आव्हान आहे. सध्या निरा डावा कालव्याला आवर्तन सुरू असल्यामुळे शेतीच्या पाण्याची परिस्थिती टिकून आहे. नवीन उसाची लागणी करण्यासाठी चांगल्या पावसाची गरज आहे, असे शेतकर्‍यांमधून बोलले जात आहे. कारखान्याचा ऊस लागण हंगाम सुरू होण्यासाठी चार-पाच दिवस उरले असताना पावसाने ओढ दिल्यामुळे या ऊस लागण हंगामावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उसाबरोबरच फळझाडांची लागवड करणारे शेतकरी देखील फळझाडांची लागवड करण्यासाठी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

Back to top button