वाकड परिसरात कचर्‍याचे ढीग | पुढारी

वाकड परिसरात कचर्‍याचे ढीग

वाकड : काळाखडक ते गुड्स सेमरिटन स्कूल रोडवर कचर्‍याचे ढीग जमा झाले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. अनेक नागरिक कामावरती जाताना रोडवर कचरा फेकतात.

त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कचर्‍याच्या ढीगाजवळच एक शाळा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेची घंटागाडी सकाळी येऊन सर्व साठलेला कचरा घेऊन जाते. परंतु, सायंकाळच्या वेळेला परत नागरिक या परिसरात कचरा फेकून जातात. या साठलेल्या कचर्‍यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्यासुद्धा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आता पावसुमळे हा कचरा कुजून दुर्गंधीत आणखी भर पडू शकते.

तसेच, डासांची उत्पत्ती होण्यास मदत होईल. त्यामुळे महापालिकेने याबाबत योग्य ती उपाययोजना करून परिसरातील कचरा उचलण्याची मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.

Back to top button