पुणे : वैमानिकाला घातला साडे सोळा लाखांचा गंडा | पुढारी

पुणे : वैमानिकाला घातला साडे सोळा लाखांचा गंडा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : स्पाईस ट्रेडींग व्यवसायातील गुंतवणूकीच्या बहाण्याने एका वैमानिकाला सायबर चोरट्यांनी तब्बल 16 लाख 62 हजार रुपयांचा आर्थिक गंडा घातला. याप्रकरणी उंड्री रोड मोहम्मदवाडी येथील 47 वर्षीय वैमानिकाने कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपींच्या विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 28 जून ते 5 जूलै 2021 या कालावधीत घडली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला माेठा निर्णय : मंत्री, राज्यमंत्री यांच्याकडील खात्यांचे फेरवाटप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे वैमानिक आहेत. त्यांचा आरोपीसोबत ‘स्टोन इमोका क्लब डॉट कॉम’ या वेब अ‍ॅड्रेसच्या माध्यमातून ऑनलाईन परिचय झाला होता. रेड वाईन तयार करण्यासाठी आवश्यक असणारे स्पाईस ट्रेडींग व्यवसाय करत असल्याची नोंद आरोपींनी संबंधीत वेब अ‍ॅड्रेसवर केली होती. त्यांची साखळी पुर्ण देशात असून, ती डीबीएस बँकेच्या वतीने चालवली जाते, त्यामध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर करु शकता व त्याचे ऑनलाईन रेकॉर्ड तुम्हाला वेळोवेळी प्राप्त होईल अशी खोटी माहिती प्रसारीत केली होती.

Alia Bhatt : गुड न्यूज! आलिया-रणबीर होणार आई-बाबा, फोटो केला शेअर

फिर्यादींनी आरोपींशी संपर्क साधला असता, त्यांना आरोपींनी गुतंवणूकीवर आकर्षक परतावा देण्याचे आमिष दाखवले. फिर्यादी आरोपींच्या सापळ्यात अडकले. त्यानंतर आरोपी सांगतील तसे त्यांनी वेळोवेळी 16 लाख 62 हजार रुपये भरले. काही दिवस वाट पाहिली तेव्हा न परतावा मिळाला न गुंतणूक केलेली रक्कम. दरम्यान, फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने याबाबत पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. दाखल तक्रार अर्जाच्या चौकशीनंतर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मचाले करीत आहेत.

Back to top button