चिखली येथील मुलीचे अपहरण | पुढारी

चिखली येथील मुलीचे अपहरण

पिंपरी : चिखली येथील मुलीस तिच्या राहत्या घरातून कशाचे तरी आमिष दाखवून पळवून नेले. ही घटना 14 जून रोजी घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला फिर्यादी या चिखली येथील जाधववाडीमध्ये राहतात.

त्यांची मुलगी वय 17 वर्ष 11 महिने हिस अज्ञात इसमाने कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले आहे. या संदर्भात महिलेने चिखली पोलिस ठाण्यात अज्ञात इसमाविरूद्ध शनिवारी (25 रोजी) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात इसमाविरूद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविला असून, पुढील तपास चिखली पोलिस करीत आहेत.

Back to top button