पिंपरी गावात तरुणीला जिवे मारण्याचा प्रयत्न | पुढारी

पिंपरी गावात तरुणीला जिवे मारण्याचा प्रयत्न

पिंपरी : ‘पळून गेलेली मुलगी तुझ्याकडे आली होती, असे सांग अन्यथा तुला चौकात विवस्त्र करून मारू.’ मात्र, फिर्यादीच्या मुलीने नकार दिल्यावर तिला आरोपींनी पोटात चाकू भोसकून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना पिंपरी गावात शुक्रवारी रात्री पावणेबारा वाजता घडली.

आरोपी बजरंग वाघिरे (रा. पिंपरीगाव) व दोन महिला आरोपी (रा. काळेवाडी) यामधील महिलेची मुलगी दोन आठवड्यापूर्वी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली होती. मात्र, आरोपी महिलेने फिर्यादी महिलेच्या मुलीस ‘माझी मुलगी तुझ्याकडे आली होती’ असे सांगण्यास सांगितले. ‘अन्यथा तुला चौकात विवस्त्र करणार’ अशी धमकी दिली. मात्र, फिर्यादी महिलेच्या मुलीने असे सांगण्यास नकार दिल्याने आरोपी बजरंग याने चाकू भोसकला.

Back to top button