मेट्रोतही विठ्ठल..विठ्ठल; टाळ-मृदंगाच्या गजरात वारकर्‍यांची मेट्रो सफर | पुढारी

मेट्रोतही विठ्ठल..विठ्ठल; टाळ-मृदंगाच्या गजरात वारकर्‍यांची मेट्रो सफर

पुणे, पुढारी वृत्तसेवा: टाळ-मृदंगाचा गजर आणि वारकर्‍यांनी विठुनामाचा केलेला जयघोष अशा भक्तिमय वातावरणात गुरुवारी वारकर्‍यांनी पुणे मेट्रोची सफर केली. पांडुरंग… पांडुरंगच्या जयघोषाने निनादलेला हा भक्तीचा सोहळा पुणेकरांनी मेट्रोमध्येदेखील अनुभवला.विनायक नवयुग मित्रमंडळ ट्रस्ट आणि सारथी कट्टा यांच्यावतीने 100 वारकर्‍यांना मेट्रोची सफर घडविण्यात आली. गरवारे मेट्रो स्टेशन ते वनाजपर्यंत वारकर्‍यांनी टाळ आणि मृदंगाच्या गजरात विठुनामाचा जयघोष करीत मेट्रोची सफर केली.

तरुणाई ‘इन्स्टा’वर
तरुणाईला सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह राहण्याचे भलतेच वेड लागलेले आहे. पालखी सोहळ्यातसुध्दा असे सोशल मीडियावर अ‍ॅ़क्टिव्ह असणारे अनेक तरुण-तरुणी पाहायला मिळाले. काही तरुण मंडळी तर पालखी रथासमोर आणि पादुकांसमोर इन्स्टाग्राम रिल्स बनविताना पाहायला मिळाली. तरुणाईसोबत अनेक ज्येष्ठ नागरिकांनाही आपल्या मोबाईलमध्ये सेल्फी काढण्याचा मोह आवरता आला नाही. या वातावरणामुळे नव्या गोष्टीही पालखी सोहळ्याशी जोडल्या गेल्या.

हेही वाचा

बीड : अवैध गर्भपात प्रकरणात डॉ.गवारेला ताब्यात घेणार

नेवासा : निबंधकांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी

नगर : पहिल्याच पावसात गुंडेगावचा बंधारा तुडूंब

Back to top button