

भोसरी : परिसरात योगा दिनानिमित योग प्रात्यक्षिकांसह सूर्यनमस्कार, प्राणायाम, ध्यान साधना आदींचे आयोजन करण्यात आले होते. चर्होली येथील अमोरा पंचकर्म रिसॉर्ट येथे मोफत योग प्राणायाम कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. योगशिक्षिका रूपाली रासकर, ज्योती थोरात, सीमा माटे, ज्ञानेश आल्हाट, राहुल रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली याचे आयोजन करण्यात आले होते.
शिबिरामध्ये सूर्यनमस्कार, पूरक हालचाली, आठ प्रकारचे प्राणायाम व चाळीस प्रकारची आसणे शिकवण्यात आले. राजमाता जिजाऊ कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिके सादर केली. या वेळी ताडासन, वृक्षासन, भुजंगासन, मंडूकासन आदींचे केली. प्रा. गोपीचंद करंडे, उपप्राचार्या डॉ. नेहा बोरसे यांनी सर्व विद्यार्थ्यांसमवेत प्रात्यक्षिके सादर केली. प्राचार्य डॉ. अशोक पाटील, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.
संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन द्वारा योग-प्राणायाम घेण्यात आले. यामध्ये योग मार्गदर्शक अनंत सकपाळ, राजेंद्र नारंगे यांनी योगा, प्राणायामचे महत्व सांगितले. आदिनाथ क्रिकेट क्लबच्या खेळाडूंना विविध प्रकारच्या योगासनांच्या प्रात्यक्षिकांसह, प्राणायाम, सूदर्शन क्रियाचे महत्व सांगण्यात आले. त्याचबरोबर खेळाडूंकडून सूर्यनमस्कार, प्राणायाम, ध्यानसाधना ही करून घेण्यात आली. योगा शिक्षक लोकेशसिंग उद्दे यांनी योग प्रशिक्षण दिले.