

इंदोरी : मावळ तालुक्यातील जांभवडे येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी एका 19 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. मुलगी गरोदर राहिल्याने साडेतीन महिन्यांनंतर हा प्रकार उघडकीस आला.
अनिल बाळू गावडे, (19, रा. सांगुर्डी, ता. मावळ) असे बाल लैंगिक अत्याचार प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित अल्पवयीन मुलीने फिर्याद दिली आहे.
ही घटना मार्च व एप्रिल 2022 मध्ये मावळ तालुक्यात जांभवडे येथे घडली. या प्रकरणी 16 जूनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी ही तिच्या चुलत भावाच्या घरात त्याच्या मुलांना खेळण्यासाठी बोलावण्यास गेली असता आरोपीने घरामध्ये फिर्यादीवर जबरदस्तीने बलात्कार करून सदरचा प्रकार कोणास न सांगण्याबाबत धमकी दिली.
फिर्यादीच्या पोटात दुखू लागल्याने दवाखान्यात तिची वैद्यकीय तपासणीत ती साडेतीन महिन्यांची गरोदर असल्याचे आढळून आले. त्यामुळे तिने पोलिस ठाण्यात येऊन तक्रार केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.