सांगवी परिसरात पाणी मीटरची चोरी | पुढारी

सांगवी परिसरात पाणी मीटरची चोरी

दापोडी : जुनी सांगवी परिसरात पाणी मीटर चोरीच्या घटना वारंवार घडत असल्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे पोलिसांनी चोरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. परिसरातील नागरिकांनी सांगवी पोलिसांना निवेदन दिले आहे.

पिंपरी : गरिबीवर मात करत प्रेमाने मिळवला पहिला क्रमांक

त्यात म्हटले आहे, की सांगवी भागात पहाटेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींकडून पाणी मिटरची चोरी होत आहे. ह प्रभाग क्षेत्रीय कार्यालयात पाणी मिटर चोरीच्या चाळीसच्यावर तक्रार अर्ज प्राप्त झाले आहेत. एका पाणी मिटरची किंमत अडीच हजार रुपये इतकी आहे. महापालिका पाणी मिटर संरक्षणाची जबाबदारी आमची नाही, असे स्पष्टपणे सांगत आहेत.

आमदारांची ‘फाईव्ह स्टार’ बडदास्त; 13 कोटींचा खर्च

यामुळे नागरिकांच्या पाणी मिटर चोरीमुळे नागरिकांना थेट आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. पहाटेच्या सुमारास घडणार्‍या अशा घटना रोखण्यासाठी गस्तीत वाढ करून चोर्‍या रोखाव्यात, असे निवेदनात म्हटले आहे. सांगवी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे फुटेजची तपासणी करून पाणी मिटर चोरी करणार्‍या व्यक्तिवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या वेळी सांगवी गुन्हे शाखेचे सुनील तांबे, विश्वनाथ शिंदे, कुंदन कसबे आदी उपस्थित होते.

 

Back to top button