अनधिकृत बांधकामावर पीएमआरडीएचा हातोडा | पुढारी

अनधिकृत बांधकामावर पीएमआरडीएचा हातोडा

पिंपरी : रांजणगाव गट नंबर 1111 व 1134 येथे वाणिज्य स्वरूपाचे सुमारे 4500 स्क्वेअर फूट व शिक्रापूर येथील गट नंबर 811व 812 येथे साधारणपणे 5500 स्क्वेअर फुटांचे अनधिकृत बांधकाम व अनधिकृत हॉटेल पीएमआरडीएच्या अनाधिकृत बांधकाम निष्कासन विभागमार्फत पाडण्यात आले.

एकाच दिवशी पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम विभागामार्फत दोन ठिकाणी यशस्वीपणे निष्कासन कारवाई करण्यात आली. ही कारवाई तीन पोकलेन यांच्या सहाय्याने करण्यात आली. कारवाईच्यावेळी पीएमआरडीएचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. तसेच, स्थानिक पािेलस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

परवानगी शिवाय कोणतेही बांधकाम करण्यात येऊ नये, असे आवाहन बन्सी गवळी नियंत्रक तथा सहआयुक्त अनधिकृत बांधकाम विभाग यांनी केले. अनधिकृत बांधकामधारकाकडून बांधकाम निष्कासन खर्च वसूल केला जाईल, असेही सांगण्यात आले.

Back to top button