पुणे: खुनी हल्ला करणार्‍या त्या टोळक्याला बेड्या; रस्त्यातून बाजुला हो म्हणल्याने केला होता खुनाचा प्रयत्न | पुढारी

पुणे: खुनी हल्ला करणार्‍या त्या टोळक्याला बेड्या; रस्त्यातून बाजुला हो म्हणल्याने केला होता खुनाचा प्रयत्न

पुणे: रस्त्याच्या बाजुला थांबण्यास सांगितल्याच्या रागातून खुनी हल्ला करणार्‍या टोळक्याला कोंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सोहिल नवाज शेख (25), सोमनाथ भाऊसाहेब सरतापे (22), अरबाज अलियाज खान (23, तिघेही रा. आश्रफनगर, कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

12 जून रोजी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास शान अक्रम खान हे त्यांचे फर्निचरचे दुकान बंद करून आश्रफनगर गल्ली क्रमांक 8 येथून जात असताना रस्त्यावर अनोळखी तीन चार व्यक्ती थांबल्या होत्या. ते आपआपसात भांडणे करित असताना शान खान यांनी त्यांना रोडमधून बाजुला होण्यास सांगितले. त्याच रागातून टोळक्याने त्यांच्यावर तलवारीने, दगडाने, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून खुनाचा प्रयत्न केला. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अनधिकृत बांधकामांवर कारवाई; शिक्रापूर, रांजणगावातील बांधकाम पाडले

गुन्हे निरीक्षक संजय मोगले, गुन्हे निरीक्षक गुन्हे जगन्नाथ जानकर यांच्या सुचनेनुसार सहायक पोलिस निरीक्षक अनिल सुरवसे, स्वराज पाटील हे त्यांच्या पथकासोबत आरोपींचा शोध घेत असताना अमंलदार दिपक जडे, जयदेव भोसले, राहुल रासगे यांना आरोपी हे आश्रफनगरमध्ये असून ते पळून जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिस उपायुक्त नम्रता पाटील, वरिष्ठ निरीक्षक सरदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Back to top button