पीक विम्याचे पैसे शेतकर्‍यांना द्या , विमा कंपन्यांकडे शिवसेनेची मागणी | पुढारी

पीक विम्याचे पैसे शेतकर्‍यांना द्या , विमा कंपन्यांकडे शिवसेनेची मागणी

हिंजवडी : पीक विमा देणार्‍या खासगी कंपन्यांनी लवकरात लवकर पीक विम्याचे पैसे देण्याची मागणी मुळशी तालुका शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे. एचडीएफसी युरो या इन्शुरन्स पॉलिसीच्या कंपनीला कोरेगाव येथील कार्यालयात जाऊन शिवसैनिकांनी जाब विचारला आहे.

शासनाकडून पीक विम्याचे पैसे कंपनीला वर्ग करूनदेखील संबंधित कंपनी मुळशीतल्या 407 शेतकर्‍यांना ते पैसे देत नाहीत. ते लवकर न दिल्यास शिवसेना स्टाईल उत्तर कंपनीला दिले जाईल, असे कंपनी प्रशासनाला सांगण्यात आले. तालुक्यातील एकुण 407 शेतकर्‍यांनी 2021 साली विमा उतरवला होता.

ग्रामीण भागातही ‘प्री-वेडिंग शूट’; पाश्चिमात्यांचे अंधानुकरण न करण्याचा विचारवंतांचा आग्रह

त्यानंतर गतवर्षी जी अतिवृष्टी झाली त्यामुळे अनेक शेतकर्‍यांचे नुकसान झाले होते. या नुकसानीची पाहणी व पंचनामादेखील झाला. त्यानंतर ते पैसे केंद्र व राज्य शासनाकडून विमा कंपनीला जमा झाले. मात्र, अद्याप मुळशी तालुक्यातील शेतकरी व शिवसेना पदाधिकारी त्यासंदभांत वारंवार तक्रारी व पाठपुरावा करूनही पैसे न मिळाल्याने त्रस्त झालेले शेतकरी आज विमा कंपनीत पोहोचले आणि अधिकारी यांना जाब विचारला.

यासंदर्भात तालुका कृषी अधिकारी यांनी विम्याचे पैसे देण्याचे पत्र दिले. तसेच, 20 तारखेपर्यंत विम्याचे पैसे देण्याचे लेखी पत्र विमा कंपनीकडून शिवसैनिकांनी घेतले.

Back to top button