पादचारी महिलेचे गंठण हिसकावले | पुढारी

पादचारी महिलेचे गंठण हिसकावले

पिंपरी : पादचारी महिलेच्या गळ्यातील गंठण दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना सोमवारी (दि. 13) रात्री साडेआठच्या सुमारास सराफ गल्ली, तळेगाव येथे घडली. या प्रकरणी फिर्यादी महिलेने मंगळवारी (दि. 14) तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Back to top button