अदानींची सपत्निक बारामती भेट काय देऊन जाणार? | पुढारी

अदानींची सपत्निक बारामती भेट काय देऊन जाणार?

बारामती : पुढारी वृत्तसेवा : देशातील बडे उद्योजक असलेल्या गौतम अदानी यांनी गुरुवारी (दि. १६) सायन्स अॅण्ड इनोव्हेशन अॅक्टीव्हीटी सेंटरच्या उदघाटनाच्या निमित्ताने बारामतीत सपत्निक हजेरी लावली. या कार्यक्रमापेक्षा उद्योगपती अदानी यांची भेट बारामतीकरांसाठी आैत्सुक्याचा विषय होती. आपल्या बारामती भेटीत ते काय देऊन जाणार याची उत्सुकता बारामतीकरांना आहे.

ब्रेकिंग! दहावीच्या निकालाची प्रतीक्षा संपली, उद्या १ वाजता निकाल ऑनलाईन जाहीर होणार

अदानी यांनी व्यासपीठावर भाषण करणे टाळले, तरीही बारामतीसाठी ते एखादा नवीन प्रकल्प देतील अशी चर्चा या निमित्ताने सुरु झाली आहे. तर अदानी यांच्या भेटीमुळे बारामतीत आज खरी दिवाळी साजरी होत असल्याचे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. उद्योजक गौतम अदानी यांच्या या दौऱ्यात त्यांच्या पत्नी प्रिती यांनीहीही हजेरी लावली. अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टकडून प्रिती अदानी यांचाही गौरव करण्यात आला. महिला बचत गटांनी तयार केलेल्या तसेच सेंद्रीय पद्धतीने उत्पादीत झालेल्या शेतमालाची पेटी त्यांना भेट म्हणून देण्यात आली. व्यासपीठावर आयोजकांनी गौतम अदानी यांना बोलण्याची विनंती केली होती. परंतु त्यांनी बोलणे टाळले.

ऐकावं ते नवलच! चक्क उंदरांनी १० तोळे सोने पळवले, पोलिसांनी गटारातून केले जप्त

बारामती एमआयडीसीत अजूनही मोठ्या प्रमाणावर भुखंड रिकामे आहेत. मोठा प्रकल्प बारामतीत यावा, अशी मागणी सातत्याने होत आहे. त्यात पुरंदर-बारामतीच्या सीमेवरील आंतरराष्ट्रीय विमानतळ अदानी ग्रुपकडून होत असल्याच्याही बातम्या येत असतात. हे विमानतळ झाले, तर पुरंदर, बारामतीच्या विकासाचा नवा मार्ग खुला होणार आहे. त्यातून बारामतीत आणखी काही नवे उद्योग येतील, अशी आशा बारामतीकरांना आहे. गुरुवारच्या अदानी यांच्या बारामती भेटीमुळे ती आणखी पल्लवित झाली आहे. व्यासपीठावर अदानी यांचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी बोलणे सुरु होते. तत्पूर्वी सेंटरच्या पाहणी निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांना सर्व माहिती देत होते.

दाऊदची धमकी देत ७५ वर्षीय व्यावसायिकाचा ३५ वर्षीय लेखिकेवर बलात्कार

खासदार सुप्रिया सुळे यांनी अदानी यांची बारामती भेट आनंदाची बाब असल्याचे म्हटले. त्या म्हणाल्या, पवार कुटुंबिय व अदानी परिवाराचे नाते काही नवीन नाही. गेली २५ ते ३० वर्षांपासून या दोन्ही कुटुंबांचे संबंध आहेत. गौतम अदानी दरवर्षी दिवाळीला बारामतीत येतात. पण आज त्यांच्या दौऱ्यामुळे बारामतीत खरी दिवाळी साजरी होत आहे. प्रिती अदानी या खास बारामतीला येण्यासाठी अहमदाबादहून पोहोचल्या आहेत. बारामतीकरांनी गेली ५५ वर्षे दिलेल्या संधीमुळेच देश-राज्य पातळीवर काम करता आले. त्यामुळे बारामतीकरांपुढे मी नतमस्तक असल्याचे त्या म्हणाल्या.

Back to top button