नाणे शाळेतील विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक

नाणे शाळेतील विद्यार्थ्यांची बैलगाडीतून मिरवणूक
Published on
Updated on

कामशेत : नाणे मावळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची ढोल-ताशांच्या गजरात बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली. या वेळी शाळा प्रशासनाच्यावतीने विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. या वेळी मावळ कृषी विस्तार अधिकारी सुवर्णा मेंगडे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक तसेच नाणे गावातील ग्रामस्थ व पालक उपस्थित होते.

पंडित नेहरू विद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात मोठ्या पारंपारिक सोहळ्याने करण्यात आली. विद्यालयात नवीन प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे औक्षण करून व गुलाबपुष्प देऊन मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.प्रवेशोत्सवाच्या निमित्ताने कामशेत गाव आणि बाजारपेठेतून पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांची ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली.

या वेळी कामशेत ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तानाजी दाभाडे, सुभाष रायसोनी, दत्ता रावते, उपसरपंच वैशाली इंगवले, सुषमा करपे यांच्यासह विद्यालयाचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शरद वाजे, आरती बोत्रे यांनी केले तर उपप्राचार्य उमेश सोनवणे यांनी आभार मानले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news