देहूतील शिळा मंदिर भाविकांनी फुलले | पुढारी

देहूतील शिळा मंदिर भाविकांनी फुलले

देहूरोड : पुढारी वृत्तसेवा:  पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी देहूत येऊन गेल्यानंतर शिळा मंदिराला वेगळेच वलय निर्माण झाले आहे. बुधवारी सकाळपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पंतप्रधानांच्या हस्ते मंगळवारी मंदिराचे लोकार्पण झाले.

या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मोदींच्या हस्ते उद्घाटनाची कोनशिला तयार करून आणली होती. मात्र, ऐनवेळी या दोन जणांची नावे त्यावर टाकण्यात आली. त्यामुळे देवस्थानची पळापळ झाली; पण त्यांनी नवीन कोनशिला बसवून तयार केली होती.

मंदिरावर फुलांची आकर्षक सजावट केली होती. मंगळवारी सुमारे दोन हजार भाविकांनी दर्शन घेतले. मंदिरातील मूर्तीचे अद्भुत रूप व शिळेच्या दर्शनाचा लाभ घेऊन वारकरी तृप्त झाल्याची भाव व्यक्त करीत होते.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले. येथून पुढे नियमित भक्ती सेवा सोडून असे कार्यक्रम होणार नाहीत. आमदार सुनील शेळके यांना मी स्वतः पत्रिका दिली होती; पण ते कार्यक्रमास उपस्थित का राहू शकले नाहीत, हे माहीत नाही. मंदिरात सर्वांनाच मुक्त प्रवेश आहे. त्यामुळे कोणीही नाराज होऊ नये.
– नितीनमहाराज मोरे,
अध्यक्ष, जगद्गुरु संत तुकाराम प्रतिष्ठान, देहू

Back to top button