पिंपरी : मद्यपीला मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा | पुढारी

पिंपरी : मद्यपीला मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

 

पिंपरी : रस्ता चुकलेल्या मद्यपीला दगडाने मारहाण करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. हा प्रकार सोमवारी (दि. 13) दुपारी अडीचच्या सुमारास मावळ तालुक्यात पुसाणे गावच्या कमानीपासून पुढे दिवडकडे जाणार्‍या रस्त्याने घडला.

चोर दरवाजाचा चढ, तर संजीवनी माचीचा उतार

संतोष सावळे (32, रा. दिवड, ता. मावळ) यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. 14) तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. रामदास साठे (रा. साठे साई, ता. मुळशी) आणि रमेश चव्हाण (39, रा. पुसाणे, ता. मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.फिर्यादी सावळे हे दारूच्या नशेत होते. त्यावेळी पुसाणे गावच्या कमानीपासून पुढे दिवडकडे जाणार्‍या रस्त्याने जात असताना ते नशेत असल्याने रस्ता चुकले. त्यानंतर ते पुसाणे गावातील एका वस्तीवर कोणाच्या तरी घरी गेले. नशेत असल्याकारणाने फिर्यादी सावळे यांना काही कळाले नाही. तेव्हा त्या घरासमोर असलेल्या दोन आरोपींनी काही एक कारण नसताना फिर्यादीला शिवीगाळ करून मारहाण केली.

Back to top button